Wednesday, November 27, 2019

महाराष्ट्रातील जनतेचा विजय


*हा तर महाराष्ट्रातील जनतेचा विजय*


रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात भाजप ने केलेल्या लोकशाहीच्या हत्येने पेटून उठलेल्या महाराष्ट्रातील जनतेने सगळ्याच आमदारांना सकाळच्या लख्ख प्रकाशात येऊन उभा राहायला भाग पाडले.
माणसं पेटून उठली कि काय होतं हे गेल्या काही दिवसात सबंध भारताने पाहिलं.
कोणी काही लॉजिक लावो, कोणी कसलाही बुध्धीभेद करो, पण जनतेने अगदी मतदानानंतरही आपलं कर्तव्य चोख पार पाडलं.
दबाव असो किंवा लाच, महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसांच्या दबावापुढे रात्रीच्या काळोखातली भाजप ची घाणेरडी कृत्यं सपशेल हरली हेच खरं..!!
ज्या क्षणी सत्तेसाठीची भाजपची काळी कृत्यं लोकांच्या नजरेस पडली त्या क्षणी माणसांनी फुटून जाण्याच्या मनस्थितीत असणाऱ्या आमदारांवर प्रचंड दबाव टाकायला सुरुवात केली. अगदी "साहेब, तिकडं जायचं असेल तर गावाकडं परत येऊ नका" असे त्यांच्या काळजातून आपसूक उमटलेले निरोपही धाडले.
याचाच परिणाम म्हणजे भाजप च्या हाताला एकही आमदार न लागणे.

संविधान बचावासाठी अहोरात्र प्रचार करणा-या सामाजिक संघटना, लोकशाहीवर प्रेम करणारे देशभरातील अनेक प्रादेशिक पक्ष आणि जनतेचे डोळे महाराष्ट्राच्या या लढाईकडे असे लागलेले होते जणू काही हि लोकशाही टिकवण्यासाठीची हि अंतिम लढाईच होती..!! 

सर्वात महत्वाचं म्हणजे या निवडणुकीमध्ये एका मुरब्बी राजकारण्याचं रुपांतर संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी उभा ठाकणार्या एका योद्ध्यात झालं आणि माणसांनी या “८० वर्षाच्या लढवय्या योध्याला दिलेली उस्फुर्त साथ". माणसांनी जशी साथ दिली तशा एका योध्द्याकडून असणाऱ्या अपेक्षाही ठेवल्या. पवारांनीही हे पक्कं ओळखलं होतं कि जर त्यांनी भाजप ला सत्तेपासून रोखलं तरच या लढ्याला आणि माणसांच्या अपेक्षांना मूर्त रूप देता येईल आणि महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात याची नोंद सुवर्णाक्षरांनी होईल अन्यथा ती इतिहासाची काळी पाने ठरतील..!
आणि म्हणूनच राष्ट्रपती पदाच प्रलोभन, केंद्रात पद हे सगळं बाजूला सारून "एक मुरब्बी राजकारणी" नाही तर "एक योध्दा" म्हणून त्यांचे निर्णय आले..!!

शेवटी कसं आहे "जे महाराष्ट्राच्या मनात तेच शरद पवारांच्या"..!!!

लोकांचा आणि लोकशाहीचा विजय असो..!!

Jay BHARAT