सामाजिक क्रांती आपोआप घडत नसते, ती घडवावी लागते,
आपोआप घडत असती तर स्त्रिया, बहुजन हजारो वर्षे गुलामीच्या क्रूर डोहात खितपत पडले नसते !
"विद्येविना..." च्या मंत्राने ज्या बहुजन समाजाला शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक अधिकाराचं भान आलं त्याच समाजातली उच्चशिक्षित पोरं आज तथाकथित बुद्धिभेदाला बळी पडुन विषारी धर्मांध गप्पा झोडतात, पराकोटीचा चिकित्साद्वेष दाखवतात त्यावेळी "विद्येच्या" मार्यादाही स्पष्ट होतात
द्वेषाचं विष उतरलं की मेंदू सडायला वेळ लागत नाही, सडक्या मेंदूचा आणि शिक्षणाचा काहीएक संबंध नाही याची आजकाल वारंवार प्रचिती येत राहते !
पण हे असं का? अनेक समाजसुधारकांच्या अपरिमित बलिदान आणि त्यागानं झालेल्या सामाजिक क्रांतीनंतरही विषवल्लीचं पीक का जोमानं वाढतंय यामागची कारणंही आपल्याच घरांमध्ये दडलीयेत !
आपला भाऊ, बहीण, मुलं, जवळचे नातेवाईक कोणत्या बैठकीत बसत आहेत, कोणाच्या संगतीत वावरताहेत, त्यांना काय दाखवलं जातंय यावर जर लक्ष नाही दिलं तर आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आणि पर्यायानं देशाला कोणीही वाचवू शकणार नाही आणि यावर उपाय म्हणजे त्यांच्याशी संवाद, चिकित्सा, वैचारिक आणि चांगल्या चर्चा आणि मुख्यत्वे करून वाचन अन्यथा महात्मा जोतिबा फुलेंनाही "विद्येविना.." चा संदेश अपूर्ण राहिल्याचा पश्चाताप होईल !
No comments:
Post a Comment