Sunday, June 6, 2021

नवीन कीड

वैचारिक क्रांतीच्या समृद्ध वारशाला लागू पाहणारी कीड म्हणजे आचार्य तुषार 

पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि वैचारिक क्रांतीचं, विज्ञान आणि मानवतेचं प्रतीक !

३५० वर्षांपूर्वी तुकोबारायांनी या वारीला आपल्या कृतीतून प्रचंड जनप्रवाह मिळवून दिला.

वारीच्या अनेकविध क्रांतिकारी वैशिष्ठ्यांमुळेच हे शक्य झाले

भारतातल्या लाखो मंदिरांमध्ये दान-दक्षिणा, उच-नीचता, शिवाशिव असे प्रकार सर्रास आढळतात

पण पंढरीच्या वारीत ही थोतांडं उन्मळून पडतात !

इथं प्रत्येक जण एकमेकांच्या पाया पडतो, लहान बाळ असो, तरुण असो, महिला असो, पुरुष असो, कोणत्याही जाती धर्माचा असो, ना दक्षिणा ना व्हीआयपी वर्दळ, मुख्य पूजेचा मानही अगदी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत एका वारकरी कुटुंबास दिला जातो, कोणत्याही प्रकारची अतिरेकी धार्मिक भावना नाही की कोणा दुसऱ्या धर्माचा द्वेष नाही !

या सोज्ज्वळ, सात्विक, समतेच्या भावनांच्या रुपाइतकी मोठी क्रांती संबंध भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासात सापडत नाही !


भस्म दंड न लागे काठी। तीर्थ आटी भ्रमण।। 

तुका म्हणे आडकाठी। नाही भेटी देवाचे।।


तुका म्हणे केली सोपी पायवाट एक एका लागी पायी रे..


पांडुरंगाच्या भेटीला भस्म, दंड, काठी, तीर्थाटन या कशाचीही गरज नाही असं तुकोबाराय स्पष्ट सांगतात, इतकंच काय तर वारीत ज्यांना ज्यांना गर्दीमुळे पांडुरंगाचं दर्शन होत नाही ते वारकरी कळसाचं दर्शन घेऊनच मागं येतात.

इतकंच काय तर वारीत ज्यांना ज्यांना गर्दीमुळे पांडुरंगाचं दर्शन होत नाही ते वारकरी कळसाचं दर्शन घेऊनच मागं येतात.

जो वारकरी वृद्धावस्था, कौटुंबिक अडचणी तसेच प्रकृती अस्वास्थ्यामुळे वारीला जाऊ शकत नाहीत तो दिंडीतल्या वारकर्यांची वेशीवर वाट पाहतो आणि त्याचंच दर्शन घेतो.


वारकरी संप्रदायाची हि समृद्ध परंपरा अशापद्धतीने विज्ञान, व्यवहार आणि तर्काच्या कसोटीवर अत्यंत सोपी केली गेलेली आहे.


तुषार भोसले म्हणजे महाराष्ट्राच्या महान वारकरी परंपरेत घुसू पाहणारे ते प्रक्षिप्तपण आहे ज्याप्रमाणे तुकोबारायांच्या अभंगांमध्ये घुसडले गेलेले प्रक्षिप्त अभंग !


नावापुढं "आचार्य" लावून आणि आडनावात "भोसले" असलं की हळुवारपणे बुद्धीभेद करण्याची खोड ही महाराष्ट्रास अजिबात नवी नाही, आंबेवाल्या मनोहर काकांनी हा प्रयोग याआधी करून अनेक तरुण पोरांचं आयुष्य आधीच नासवलं आहे.


करोना महामारीत ३२ लाखांच्या वर गर्दी होणाऱ्या कुंभ मेळ्यास परवानगी देऊन ज्याप्रमाणे विज्ञानविरोधी भाजप राज्यकर्त्यांनी उत्तरेतला गंगातीर प्रेतांनी भरून टाकला त्याचप्रमाणे इथंही तुषार भोसलेंच्या खांद्यावर बंदूक ठेऊन (सत्तेत नसल्याने) कार्यभाग उरकायचा चालू आहे.


सर्व वारकऱ्यांना आणि नागरिकांना नम्र विनंती, इंद्रायणीचा तीर "गंगातीर" होऊ द्यायचा नसेल तर तुषार भोसलेंसारख्या भोंदूंची वैचारिक कीड आपल्या समृद्ध आणि महान वारकरी परंपरेला न लागू दिलेलीच बरी !

No comments:

Post a Comment